मंत्री दीपक केसरकर यांची भाजप कार्यालयाला भेट


सावंतवाडी
शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज मंत्री दीपक केसरकर यांनी काल भरला. काल जी गर्दी झाली होती ती युतीच्या सर्व नेत्यांच्या केलेल्या प्रामाणिक कामाची पोचपावती होती. कोणी कितीही काड्या करायचे प्रयत्न केले तरी युती ही अभेद्य आहे. त्यामुळे सर्वांनी जोमाने कामाला लागा. भाजप कार्यालयाच्या भेटीवेळी दीपक केसरकर यांनी भाजप कार्यकर्त्यांना बोलतांना मत व्यक्त केले .
यावेळी भाजपच्या पदाधिरी आणि कार्यकर्त्यांनी कोणतीही काळजी करू नका,तुम्हाला मोठ्या मताधिक्याने विजयी करू असे सांगितले.
यावेळी भाजपचे युवराज लखमराजे भोसले, भारतीय पक्षाचे सरचिटणीस महेश सारंग, गुरुनाथ पेडणेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख नीता सावंत, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, चंद्रकांत जाधव, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले आनंद नेवगी आदी युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..


