ठळक घडामोडी

तळवडे व्यापारी संघातर्फे दीपावली कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन!ज्येष्ठ व्यापारी अण्णा वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

तळवडे व्यापारी संघातर्फे दीपावली कार्यक्रमाचे थाटात उद्घाटन;

ज्येष्ठ व्यापारी अण्णा वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

तळवडे:

तळवडे व्यापारी संघाने दीपावली (दिवाळी) निमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. तळवडे येथील ज्येष्ठ व्यापारी अण्णा वराडकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी तळवडे व्यापारी संघाचे पदाधिकारी आणि स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला सावंतवाडी पंचायत समिती माजी सभापती पंकज पेडणेकर,व्यापारी संघाचे अध्यक्ष उदय परब, उपाध्यक्ष प्रशांत पडते, सचिव सुधीर गावडे, सहसचिव बाळू कांड, खजिनदार समीर परब, सह खजिनदार सतीश कासार ,माजी अध्यक्ष बंटी वराडकरसनम कासार, दाजी वराडकर, राजन कास्टये, उमेश पालकर , यांच्यासह तळवडे बाजारपेठ मधील अनेक व्यापारी बांधव या सोहळ्यात सहभागी झाले होते.
तळवडे व्यापारी संघाने आयोजित केलेला हा दीपावली कार्यक्रम व्यापारी बांधवांमध्ये उत्साहाचे आणि एकजुटीचे वातावरण निर्माण करणारा ठरला.
तळवडे येथील व्यापार वृद्धी आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी तळवडे व्यापारी संघाने नेहमीच पुढाकार घेतला असून, हा दीपावलीचा कार्यक्रम त्या परंपरेला पुढे घेऊन जाणारा ठरला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार व्यापारी सघ अध्यक्ष उदय परब, तर सूत्रसंचालन रामचंद्र कुडाळकर यांनी केले