ठळक घडामोडी

सावंतवाडी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचा माजगाव येथील सावंत-भोंसले परिवारातर्फे सत्कार


सावंतवाडी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचा माजगाव येथील सावंत-भोंसले परिवारातर्फे सत्कार


सावंतवाडी:


सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रीमंत सौ. श्रद्धाराजे लखमराजे भोंसले यांचा माजगाव येथील सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सावंतवाडी राजवाडा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्रीमंत खेमसावंत भोंसले म्हणाले की, “सावंतवाडी संस्थान सुरुवातीपासूनच सावंत-भोंसले परिवार आणि मित्रमंडळाच्या पाठीशी असून हा स्नेह व आपुलकी यापुढेही कायम वृद्धिंगत ठेवावी.” युवराज्ञी श्रीमंत सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी आपला सन्मान केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला अनंत बुधाजी सावंत, सौ. अनिता अनंत सावंत, नारायण उर्फ बापू सावंत, प्रताप सावंत, अ‍ॅड. शामराव सावंत, विश्वनाथ उर्फ उमेश सावंत, मेघाजी सावंत, रूद्राजी भालेकर, जनार्दन सावंत, विनोद वामन सावंत, सुनील सावंत, महेश सावंत, मंगेश सावंत, अजय सावंत, नरेश सावंत, विनोद सावंत, प्रमोद सावंत, दत्ताराम मेस्त्री, अनिकेत सावंत आदी उपस्थित होते.