निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल लच्या विद्यार्थ्यांनी श्री देव घोडेमुख मंदिर परिसरात राबवली स्वच्छता मोहिम!


श्रमदानातून दिला स्वच्छतेचा धडा
सावंतवाडी
वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड पेंडूर या गावाचे प्रसिद्ध व जागृत असलेले देवस्थान श्री घोडेमुख मंदिर येथील प्रसिद्ध कोंबड्याची जत्रा नुकतीच पार पडली .या जत्रेनिमित्त लाखों भाविक जनसमुदाय घोडेमुख जत्रोत्सवला आले होते.

नवस फेडण्यासाठी मानाचा कोंबडा या ठिकाणी दिला जातो. यावेळी लाखों भाविक नतमस्तक होण्यासाठी गर्दी करतात. याच जत्रेचे औचित्य साधून व स्वच्छतेचा पायंडा घालून देण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथील इयत्ता सहावी ते आठवीच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेत मंदिराच्या आसपासचा संपूर्ण परिसर श्रमदानातून स्वच्छ करून एक लाख मोलाचा असा स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पसरविला. या कार्याबद्दल संपूर्ण स्तरातून विद्यार्थ्यांची प्रशंसा व कौतुक होत आहे.


.ग्रामसचिवालय पेंडूरचे सरपंच, ग्रामसेवक व अन्य सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाबद्दल कौतुक केले. सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे चेअरमन डॉ. शेखर जैन , प्रशालेचे मुख्याध्यापक श्री हेमंत तानावडे व अन्य शिक्षक यांचे सहकार्य लाभले. या स्वच्छतेच्या कार्यक्रमात प्रशालेचे सहायक शिक्षक श्री मनिष मदन सावंत. श्रीमती स्नेहल बाबली गवस व श्रीमती श्रेया सचिन परब या शिक्षकांनीही सहभाग घेतला होता.

