तळवडे येते निमंत्रित आयोजित कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ विजेता तर उपविजेता गिरोबा सांगेली संघ ठरला


सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने बाळू कांडरकर मित्र मंडळ, तळवडे व ग्रामस्थ आयोजित, स्वर्गीय. प्रकाश दादा परब स्मृती चषक वर्ष (17 वे) भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. यशस्वीरित्या संपन्न झाली
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने बाळू कांडरकर मित्र मंडळ, तळवडे व ग्रामस्थ आयोजित, स्वर्गीय. प्रकाश दादा परब स्मृती चषक वर्ष (17 वे) भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा. (पुरुष गट) तळवडे येते आयोजित करण्यात आली होती. या निमंत्रित या स्पर्धेमध्ये 14 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ विजेता ठरला तर द्वितीय उपविजेता संघ गिरोबा सांगेली संघ ठरला तूर्तीय क्रमांक जय मानसेश्वर वेगुर्ला चतुर्थ क्रमांक शिस्तबद्ध संघ पंचक्रोशी दोडामार्ग,अष्टपैलू खेळाडू- सिद्धेश भडसाळे,उत्कृष्ट चढाई- सुशील पाटकरउत्कृष्ट पकड – प्रदीप भालेकर.उदयोन्मुख खेळाडू – साई नेवगी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.



यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन देवा काबळी, सुशील दळवी, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, बाळू कांडरकर, प्रसाद आरांवदेकर , विकी केरकर,महेश वडाचे पाटकर, आपा परब, विलास नाईक, रविंद्र सावंत, श्यामसुंदर मालवणकर, विलास परब, गजानन परब, विनोद दळवी, राजन कास्टे, शरद परब, नारायण परब, दिनेश परब, लक्ष्मण परब, कबड्डी असोसिएशनचे पदधिकारी पंच , बाळू कांडरकर मित्र परिवार यांनी हि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.



