भाजप पक्षातर्फे नवनिर्वाचित बुथ अध्यक्ष यांचा जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव आणि मंडल अध्यक्ष आबोंली रवींद्र मडगावकर यांनी केला सत्कार


सावंतवाडी
भारतीय जनता पार्टी चे नवनिर्वाचित मळगाव बुथ अध्यक्ष यांचा चंद्रकांत जाधव जिल्हा चिटणीस भाजप आणि मंडल अध्यक्ष आबोंली रवींद्र मडगावकर यांनी सत्कार केला.
मळगाव गावात भाजपचे संघटन चांगल्या प्रकारे मजबूत होण्यासाठी मळगाव मध्ये चंद्रकांत जाधव जिल्हा चिटणीस ,आणि रवींद्र मडगावकर मंडल अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत.बुथ अध्यक्ष यांचा पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व सिद्धेश तेडोलकर, गणपत शिरोडकर ,अँड. प्राध्यापक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रवींद्र मडगावकर व चंद्रकांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक बुथ अध्यक्ष यांनी भाजप पक्ष बळकट करण्यासाठी व पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. सर्वाना विश्वासात घेऊन भाजपाचे काम करावे .पक्ष आपला निश्चित सन्मान करत राहिल. असे त्यांनी सांगितले.
या वेळी उपस्थितीत .गणेश पेडणेकर..निळंकठ बुगडे .राजु परब .बुथ अध्यक्ष. सुदेश राऊळ बुथ क्रमांक 71.. रूपेश सावंत बुथ क्रमांक 70 .मदन तेडोलकर बुथ क्रमांक 59. महेश गवंडे बुथ क्रमांक 60. दिपक जोशी बुथ क्रमांक 61या सर्व बैठकीचे सुत्र संकलन व आभार प्रदर्शन गणेश पेडणेकर यांनी केले.