ठळक घडामोडी

शक्तीपीठ महामार्गाची अलायमेंट बदलण्याची मागणी केली आहे! रेडी बंदाराला हा रस्ता जोडला गेल्यास यांचा फायदा होईल

शक्तीपीठ महामार्गाची अलायमेंट बदलण्याची मागणी मी केली आहे. लवकरच यासाठी टीम येणार आहे. रेडी बंदाराला हा रस्ता जोडला गेल्यास यांचा फायदा होईल. अशी माहिती आमदार दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सावंतवाडी या ठिकाणीं दिली.हा मार्ग शक्तीपीठ जोडणारा आहे. या महामार्गाचा कोकणाला फायदा होण्यासाठी माझा प्रयत्न आहे. बांदा ही बाजारपेठ गजबजलेली आहे. तिथे होणार नुकसान देखील यामुळे टळू शकेल असं मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, सातार्डा पुल दूरूस्ती सुचना आपण अधिकारी वर्गांला देणार आहे. आंबोलीत दुर्घटना घडू नयेत यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन टीम तैनात आहेत. यासाठी आवश्यक कीट त्यांना पुरविण्यात आल्याची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडी याठिकाणी पत्रकार परिषदेत दिली.

विजेच व्यवस्थापन व आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या टीम गावागावात निवासाठी राहतील यासाठी प्रयत्न करण्याचे दिले आदेश

मतदारसंघातील वीज समस्यांबाबत आज बैठक झाली. यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. सोमवारी ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याचं काम महावितरण करणार आहे. त्यांना आवश्यक वाहन मी आजच भाडेतत्त्वावर पुरवीत आहे. तसेच इतर साधनसामुग्रीची कमी पडणार नाही याची दक्षता घेतली आहे. तसेच विजेच व्यवस्थापन व आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या टीम गावागावात निवासाठी राहतील यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. दुर्गम भागात त्यांची सोय प्रशासन करेल अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, महावितरण अभियंता अभिमन्यू राख, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब उपस्थित होते.