सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी

सावंतवाडी तालुका आयोजित विविध क्रीडा स्पर्धा प्रकारांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धांपर्यंत मजल मारली.
14 वर्षे खालील वयोगटातील क्रीडा स्पर्धांमध्ये इयत्ता सातवीतील कु. सौम्या परब हिने 100 मीटर हर्डल्स या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. 17 वर्षे खालील वयोगटातील क्रीडा स्पर्धांमध्ये इयत्ता नववीतील कु. ओम बाबु नाईक या विद्यार्थ्याने पाच किलोमीटर चालणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता दहावीतील कु. नारायण संतोष म्हारव या विद्यार्थ्याने 100 मीटर हर्डल्स या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला तसेच इयत्ता दहावीतील विद्यार्थी कु. दिपेश दत्तप्रसाद परब याने भालाफेक या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्वल केले. सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील क्रीडा शिक्षिका श्रीमती धनश्री तुळसकर मॅडम यांचे योगदान लाभले होते.
दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. शेखर जैन सर, प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. हेमंत तानावडे सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.