

गणेशाच्या चरणी “महाआरती” करीत ठाकरे सेनेचे मळेवाड मध्ये आंदोलन!वीज अधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या विरोधात नाराजी; चांगली बुद्धी दे , “श्री” चरणी गाऱ्हाणे

गणेशाच्या चरणी “महाआरती” करीत ठाकरे सेनेचे मळेवाड मध्ये आंदोलन
वीज अधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या विरोधात नाराजी; चांगली बुद्धी दे , “श्री” चरणी गाऱ्हाणे
सावंतवाडी
वीज कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आज ठाकरे शिवसेनेकडून पुकारण्यात आलेल्या महाआरती आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, जिल्हा परिषद सदस्य राजन आबा केरकर , गुरुनाथ नाईक , नीलेश शिरसाट , बाळा रेडकर , रवि तळवणेकर , मुन्ना मुळीक , नंदू नाईक, प्रकाश राऊत, वासुदेव राऊळ , सचिन गावडे , नम्रता झारापकर , स्मिताली नाईक , शिल्पा नाईक , सुभद्रा नाईक , प्रशांत नाईक , बाळा आरोंदेकर , संतोष पेडणेकर , अनिल विर्नोडकर , संजय रेडकर , गोकुळदास मोठे , रामदास पेडणेकर , सारंग कोरगांवकर , तुषार पालव , नितिन कांबळी , बबन राउत, रवींद्र काजरेकर, रवी सावंत, अनिल जाधव, विलास परब आधी मोठ्या संख्येने पदाधिकारी ग्रामस्थ रिक्षाव्यवसायिक व मळेवाड चौकातील व्यापारी वर्ग उपस्थित होते. महारतीला मोठ्या प्रमाणात लोक उपस्थिती होते.





