

सावंतवाडीत तालुक्यांतील तळवडे येथे दत्तभक्तीचा महासोहळा! खेरवाडी येथे दत्त जन्मोत्सवाचे आयोजन
सावंतवाडीत दत्तभक्तीचा महासोहळा! खेरवाडी येथे दत्त जन्मोत्सवाचे आयोजन
सावंतवाडी/तळवडे :
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री दत्त मंदिर, खेरवाडी येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मार्गशीर्ष पौर्णिमेला (दत्त जयंती) भव्य श्री दत्त जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. बुधवार, ०३ डिसेंबर २०२५ ते शुक्रवार, ०५ डिसेंबर २०२५ या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंतीचा मुख्य सोहळा पार पडेल.
दत्तात्रय सेवा मंडळ तेंडूलकर परब कुटुंबीय, तळवडे यांच्या वतीने सर्व ग्रामस्थ, भाविक आणि बंधू-भगिनींना या सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📍 तीन दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा :
बुधवार, ०३ डिसेंबर २०२५ (शुभारंभ)
दत्तात्रय सेवा मंडळ तेंडूलकर परब कुटुंबीय, तळवडे यांच्या वतीने सर्व ग्रामस्थ, भाविक आणि बंधू-भगिनींना या सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
📍 तीन दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा :
बुधवार, ०३ डिसेंबर २०२५ (शुभारंभ)
- सायं. ०७:०० वा. : उत्सवाचा प्रारंभ कीर्तनकार ह. भ. प. बुवा श्री. रामचंद्र मेस्त्री (कालेली-सावंतवाडी) यांच्या सुश्राव्य कीर्तनाने होणार आहे.
गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ (श्री दत्त जयंती)
हा दिवस जन्मोत्सवाचा मुख्य दिवस असेल. - सका. ०७:०० वा. पासून : श्री दत्त मूर्ती पूजन आणि नामस्मरण.
- सायं. ०७:०० वा. : तळवडे कुंभारवाडी मंडळ व वारकरी सांप्रदाय यांचा हरिपाठ.
- रात्री ०८:०० वा. : गुरुकृपा भजन मंडळ-न्हावेली घोडेमुख (बुवा-रोहीत निर्गुण) यांचे भजन.
- रात्री ०९:०० वा. : स्थानिक भजने सादर केली जातील.
- रात्री ११:०० वा. : ह. भ. प. बुवा श्री. मनोज खोचरे (घावनळे-कुडाळ) यांचे श्री दत्त जन्मोत्सवाचे विशेष कीर्तन होईल.
- रात्री १२:०० वा. : मध्यरात्री ठीक १२:०० वाजता श्री दत्त जन्मोत्सव सोहळा आणि महाआरती संपन्न होईल.
- रात्री ०१:०० वा. : यानंतर लगेचच मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग सादर केला जाईल.
शुक्रवार, ०५ डिसेंबर २०२५ (उत्सवाची सांगता) - सका. ०७:०० वा. : मूर्तीपूजन.
- दुपा. १२:०० वा. : महाआरती.
- दुपा. ०१:०० ते ०३:०० वा. : महाप्रसादाने या तीन दिवसीय उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
आयोजकांनी सर्व भक्तांनी या पवित्र धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री दत्तमहाराजांचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन केले आहे.





