सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील श्री साईबाबांच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


सावंतवाडी :
सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील श्री साईबाबांच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईभक्त मंडळ, सावंतवाडी यांच्यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त गुरुवार १७ एप्रिल रोजी दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये साईंची पूजा, अभिषेक व आरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.०० वाजता साईंच्या पूजेने होईल. त्यानंतर सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत महाप्रसादाचे वितरण केले जाईल. सायंकाळी ६.०० वाजता श्री सिद्धेश्वर उंदीरगाव भजन मंडळ तळवडे यांचे सुश्राव्य भजन आयोजित केले आहे.
कार्यक्रमाच्या सांगतेसाठी रात्री ८.०० वाजता श्री चंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा ‘गणेश महिमा’ या दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी बुवा म्हणून श्री. उदय नागडे, पखवाज वादक म्हणून मेहुल कोंडस्कर आणि तबला वादक म्हणून विलास नाईक उपस्थित राहणार आहेत.
तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन श्री साईभक्त मंडळ, भवानी चौक, सावंतवाडी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.