

मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक!पालिकेवर भगवा फडकवा”-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक
पालिकेवर भगवा फडकवा”उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मालवण प्रतिनिधी:
मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने येथील टोपीवाला हायस्कूल येथे आज (सायंकाळी) प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी मालवणच्या जनतेला जोरदार आवाहन केले.
“मालवणच्या भविष्याचा फैसला करणारी ही निवडणूक असून तुमचे एक मत इतिहास आणि परिवर्तन घडवणार आहे. विकास मंत्रालयात नाही, तर मालवणच्या दारात आणायचा आहे. त्यामुळे येत्या २ तारखेला परिवर्तनाची लाट आणत ममता वराडकर यांच्यासह सर्व नगरसेवकांना विजयी करत मालवण पालिकेवर भगवा फडकवा,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
विकास आणि बॅकलॉग भरून काढण्याचे आश्वासन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी महायुतीच्या उमेदवार ममता वराडकर यांना विजयी करण्याचे जोरदार आवाहन केले. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवणचा बॅकलॉग भरून काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विविध विकासकामे आणि सरकारच्या योजनांवर भर देत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना एकमताने निवडून देण्याची विनंती केली.
या जाहीर सभेत उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, राजन तेली, संजय आंग्रे, काका कुडाळकर, बाळा चिंदरकर, संजय पडते, महेश कांदळगावकर, मनोज राणे, उमेश नेरुरकर, विजय चव्हाण, दिपलक्ष्मी पडते यांच्यासह उमेदवार ममता वराडकर, प्राजक्ता शिरवलकर, मधुरा तुळसकर, संग्राम साळसकर आणि सर्व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.






