मळगाव ग्रामस्थ तसेच महिला बचत गटांच्या वतीने भूतनाथ मंदिर परिसरात राबविण्यात आली स्वच्छता मोहिम


जीवन ग्रामसंघ कुंभार्ली व मळगाव ग्रामस्थांच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम
सावंतवाडी
मळगाव या ठिकाणी श्री देव भूतनाथ मंदिर जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जीवन ग्रामसंघ कुंभार्ली, मळगाव ग्रामस्थ तसेच महिला बचत गटांच्या वतीने संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबवत मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली. या उपक्रमाचे मळगाव गावातून व परिसरातून कौतुक होत आहे.
या स्वच्छता उपक्रमावेळी सर्वप्रथम संपूर्ण मंदिर परिसरात झाडलोट करत परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेला चारा ग्रास कटरच्या सहाय्याने कापण्यात आला. यावेळी जमा झालेला सुका कचरा, प्लास्टिकचा कचरा, कागद, झाडाचा सुका पाला, पुठ्ठा आदी जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
श्री देव भूतनाथ देवाच्या जत्रोत्सवासाठी येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली. या स्वच्छता अभियानात ग्रामस्थ पांडुरंग राऊळ, केतन नार्वेकर, स्नेहल जामदार, तुषार वालावलकर, तुळशीदास नाईक, विश्वनाथ गोसावी, सागर राणे, ज्ञानेश्वर राऊळ, निखिल राऊळ, प्रसाद राऊळ, सिद्धेश तेंडोलकर, महेश गवंडे, सहदेव राऊळ, राजन राऊळ, विवेक नार्वेकर, महेश शिरोडकर, उदय जामदार, अर्चना पेडणेकर आदी ग्रामस्थांसह जीवन ग्रामसंघ कुंभार्लीच्या अध्यक्षा छाया हरमलकर, सचिव शोभा मेस्त्री, कोषाध्यक्षा विजया गवंडे, सीआरपी रागिणी शिरोडकर, लिपिका श्रावणी वेटे आदींसह जीवन ग्रामसंघचे इतर सदस्य सहभागी झाले होते.
या स्वच्छतेवेळी आखणीसाठी लागणारा चुना तसेच इतर खर्च पांडुरंग राऊळ यांनी केला. ग्रामस्थ सागर राणे यांनी या साफसफाईसाठी ग्रासकटर विनामुल्य तर संतोष नार्वेकर यांनी चहासाठी लागणारे ग्लास विनामूल्य उपलब्ध करून दिले. तसेच प्रसाद लुमाजी, अर्चना पेडणेकर, तुषार वालावलकर, उदय जामदार, केतन नार्वेकर, बाप्पा नाटेकर यांनी या उपक्रमासाठी आर्थिक मदत केली.या स्वच्छता अभियानाला मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी भेट दिली . या स्वच्छता उपक्रमाबद्ल मळगाव देवस्थान कमिटीच्यावतीने स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.