श्री देव घोडेमुख देवाच्या जत्रोत्सवाला सकाळपासूनच भक्तगणांची गर्दी! 360 चाळ्याचा अधिपती श्री देव घोडेमुख देवाचा कोंब्याचां जत्रोत्सव आज

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज संपत्न होत आहे.३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्रीदेव घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. श्री देव घोडेमुख देवाच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच भक्त जणांनी उंच डोंगर माथ्यावर असलेल्या मंदिर ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती .सिंधुदुर्ग तसेच अन्य महाराष्ट्र राज्या बरोबरच गोवा, व कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणात भावीक दाखल झाले होते.

हा जत्रोत्सव कोंब्याचां जत्रोत्सव म्हणुन प्रसिद्ध आहे .नवसाला पावणारा देव म्हणून श्री देव घोडेमुखाची ख्याती महाराष्ट्र राज्य बरोबर गोवा , कर्नाटक राज्यात पण पसरली आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला कोब्याचा नवस बोलला जातो.व जत्रोत्सवावेळी फेडला जातो .शेकडो वर्षाची परंपरा आजही भक्तीभावे सर्व भक्तगण श्रद्धेने पाळतात.दरवर्षी वाढत चाललेली भक्तगणांची गर्दी या देवाची महती सांगून जाते. या जत्रोत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांनी यावेळी दर्शनासाठी गर्दी केली होती.