सिंधुदुर्ग येथील कु. शमिका सचिन चिपकर हिची राजकोट – गुजरात येथे होणाऱ्या ६८ व्या नॅशनल स्कूल गेम २०२४-२५ साठी सलग दुसऱ्यावर्षी झाली निवड

शमिका चिपकरच सर्वत्र होत आहे कौतुक सिंधुदूर्ग जिल्याच नावं केलं उज्वल सध्या म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिर मध्ये घेत आहे शिक्षण

गोवा

गोवा राज्याच्या क्रीडा व युवक कार्य संचालनालयामार्फत झालेल्या माध्यमिक शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ मध्ये म्हापसा येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिर येथे आठवीत शिकत असलेल्या सिंधुदुर्ग येथील कु. शमिका सचिन चिपकर हिने ५० मी. १०० मी. व २०० मी. ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात राज्यस्तरावर तीन सुवर्णपदके प्राप्त केली आहेत. त्यामुळे तिची राजकोट – गुजरात येथे होणाऱ्या ६८ व्या नॅशनल स्कूल गेम २०२४-२५ साठी सलग दुसऱ्यावर्षी निवड झाली आहे.

तिच्या या यशाबद्दल आमोणकर विद्यामंदिरच्या शिक्षकवृंदांनी विशेष कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत गोवा सरकार यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील वयोगटात ५ कि.मी. रंनिगमध्ये शामिकाने दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यावेळी तिला गोवा राज्याचे क्रीडा मंत्री श्री. गोविंद गावडे यांच्याहस्ते पारितोषिक देण्यात आले. ती सध्या खेलो इंडिया मध्ये प्रशिक्षक सुजित सर यांच्याकडे जलतरणाचे प्रशिक्षण घेत आहे .
शमिका सिंधुदुर्ग मध्ये असताना तिला प्रशिक्षक श्री. प्रवीण सुलोकर सर व श्री. दीपक सावंत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.