

माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी शिक्षणमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी आज सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडी येथील काझी शहाबुद्धीन मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या पत्नीसह मतदानाचे कर्तव्य पूर्ण केले.
यावेळी बोलताना आमदार केसरकर यांनी लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रिया मजबूत करावी, असा संदेश त्यांनी दिला.





