तळवडे येथील जागृत देवस्थान श्रीदेवी वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील जागृत देवस्थान श्रीदेवी वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न झाला. यावेळी मोठ्या हजारो भक्तांनी श्रीदेवी सातेरी चरणी नतमस्तक होऊन ओट्या केळी ठेवून देवीचे दर्शन घेतले . सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्रीदेवी सातेरी देवस्थाने जागृत देवस्थान आहे या देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात भक्तगणांची गर्दी होते त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग पण या जत्रेला येतो यावेळी दशावतार नाट्यप्रयोग झाला .यावेळी रसिक वर्गांनी पण मोठ्या प्रमाणात रात्र गर्दी केली होती.