ठळक घडामोडी

शेतकरी यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा! जास्तीत जास्त शेतकरी यांनी सोसायटीचे सभासद व्हावे! श्री देव क्षेत्रपालेश्वर सहकारी सेवा सोसायटी अध्यक्ष तथा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आवाहन

श्री देव क्षेत्रपालेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीला सलग सातव्या वर्षी ‘अ’ वर्ग केला प्राप्त /सभासदांना ९% लाभांश j

वेंगुर्ला

होडावडे येथील श्री क्षेत्रपालेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी वर्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली या झालेल्या बैठकीत, संस्थेचे अध्यक्ष तथा सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी शेतकरी सभासदांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच जास्तीत जास्त शेतकरी यांनी सोसायटीचे सभासद व्हावे असे आव्हान यावेळी केले .शासनाच्या योजनांमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या बैठकीमध्ये संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. संस्थेची आर्थिक शिस्त आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यांमुळेच सलग सात वर्षे ‘अ’ वर्ग मिळवणे शक्य झाले आहे. १००% कर्ज परतफेड हे संस्थेच्या आर्थिक स्थैर्याचे आणि सभासदांच्या विश्वासाचे प्रतीक आहे.

होडावडे येथील श्री क्षेत्रपालेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड संस्थेने गेल्या सात वर्षांपासून लेखापरीक्षणात (ऑडिटमध्ये) सातत्याने ‘अ’ वर्ग कायम राखत एक आदर्श निर्माण केला आहे. संस्थेने बँक स्तरावर घेतलेल्या कर्जाची १००% परतफेड केली असून, यावर्षी सभासदांना ९% लाभांश देण्यात आला आहे.

नवीन इमारतीचा निर्णय:


या महत्त्वपूर्ण बैठकीत श्री देव क्षेत्र पालेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नवीन इमारत बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे संस्थेचे कामकाज अधिक सुव्यवस्थित होऊन सभासदांना उत्तम सेवा पुरवता येईल.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि बहुसंख्य शेतकरी सभासद उपस्थित होते. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले आणि संस्थेच्या पुढील वाटचालीवर चर्चा करण्यात आली. सोसायटीच्या या प्रगतीमुळे स्थानिक शेतकरी आणि सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी व्यासपीठावर होडावडे येथील श्री क्षेत्रपालेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी अध्यक्ष तथा सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री.मनिष प्रकाश दळवी ,श्री.नारायण लाडू पार्सेकर उपाध्यक्ष , तसेच संचालक श्री. देऊ लाडू दळवी श्री.मनोहर गंगाराम नाईक तसेच यावेळी संचालक श्री.सुरेश महादेव जाधव ,श्री.अर्जुन जगन्नाथ दळवी , श्री.राघोबा गोविंद दळवी ,श्री.गुरुनाथ अर्जुन दळवी,श्री.गंगाराम रमेश सावंत,श्रीम.विलासिन सुनील दळवी,श्रीम.तारामती हरिश्चंद्र सातार्डेकर,श्री.विजय अर्जुन होडावडेकर , श्री.अनंत राजाराम गोसावी , श्री.दिगंबर सखाराम दळवी , श्री.पराग प्रभाकर सावंत, तसेच सोसायटीचे सचिव श्री.राजबा रमाकांत सावंत हे व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी त्यांनी संस्थेच्या अहवालाचे वाचन केले. तसेच शेतकरी वर्ग यावेळी या बैठकीला उपस्थित होता .