सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव या वर्षी 16 नोव्हेंबर 2024

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी सोनुर्ली माऊलीचा जत्रोत्सव या वर्षी 16 नोव्हेंबर 2024 रोजी संपन्न होत आहे. सावंतवाडी तालुक्यातील श्रीदेवी सोनुर्ली माऊलीच्या जत्रोत्सव सोहळयाला लाखो भाविक गर्दी करतात . हजारो महिला, पुरुष भक्तगण आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर देवीच्या चरणी लोटांगण घालून आपला नवस फेडतात. या जत्रोत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे महाराष्ट्रातील तसेच,गोवा ,कर्नाटक राज्यातील कानाकोपऱ्यातून सोनुर्ली माऊलीचे भक्तगण गर्दी करतात.
या दिवशी सकाळी धार्मिक कार्यक्रम,पूजाअर्चा,त्यानंतर देवीचे दर्शन,ओटी भरणे,नवस फेडणे व रात्री महिला व पुरुष यांचे नवसाचे लोटांगण घालणे असा कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्व भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानं कमिटीकडून करण्यात आले आहे.





