फ्लाय९१ची मोठी घोषणा: उन्हाळ्यात १५०+ उड्डाणांसाठी विमान सेवा तयार


फ्लाय९१ची मोठी घोषणा: उन्हाळ्यात १५०+ उड्डाणांसाठी विमान सेवा तयार
~सध्या आठवड्यात १००+ उड्डाणे.
~फ्लाय९१ ही एकाच वेळी दोन एटीआर विमाने खरेदी करणारी पहिली भारतीय प्रादेशिक विमान कंपनी बनली आहे.
पणजी, एप्रिल २०२५:
गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (एमआयए) आधारित फ्लाय९१ ही प्रादेशिक विमान सेवा सध्या आठवड्याला १०० हून अधिक उड्डाणं करत आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात ही संख्या १५० पर्यंत वाढवण्याची योजना विमान सेवा आखात आहे असे सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
फ्लाय९१ने मार्च २०२५ मध्ये विमानसेवेचे एक वर्ष पूर्ण केले आहे. या कालावधीत ३,५०० हून अधिक उड्डाणं पार पाडत, जवळपास १.७ लाख प्रवाशांनी फ्लाय९१चा प्रवास अनुभवला. सेवा सुरू झाल्यापासून कंपनीने प्रत्येक आठवड्यात नियमितपणे १०० उड्डाणांची यशस्वी अंमलबजावणी केली असून, वेळापत्रकाच्या पालनातही सातत्य दाखवले आहे. आता उन्हाळी प्रवासाच्या वाढत्या मागणीसाठी १५०+ उड्डाणांची तयारीही करण्यात आली आहे.
फ्लाय९१चं तिसरं एटीआर ७२-६०० विमान आता अधिकृतपणे फ्लीटमध्ये समाविष्ट झालं आहे, तर चौथं विमान लवकरच दाखल होणार आहे. एकाच वेळी दोन एटीआर ७२-६०० विमानांची थेट खरेदी करणं हा भारताच्या प्रादेशिक विमान वाहतुकीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
एटीआर ७२-६०० ही ७२ आसनांची इंधन कार्यक्षम विमानं लहान धावपट्ट्यांवर सहज उतरण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जातात. फ्लाय९१च्या फ्लीटमध्ये या विमानांचा समावेश झाल्यामुळे, टियर २ आणि टियर ३ शहरांसह दुर्लक्षित भागांशी हवाई संपर्क प्रस्थापित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट अधिक सुलभ आणि प्रभावी ठरणार आहे.
नवीन उपक्रमाच्या रूपाने, फ्लाय९१ ने उड्डाणादरम्यान गरम जेवण व पेयांची पूर्व-बुकिंग सेवा सुरू केली आहे. ही सेवा देणाऱ्या मोजक्या प्रादेशिक एटीआर ऑपरेटर्सपैकी एक बनण्याचा मान फ्लाय९१ ला मिळाला आहे.
“आमच्या तिसऱ्या एटीआर विमानाचं फ्लीटमध्ये स्वागत ही आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. एकाच वेळी दोन विमानांची खरेदी हे आमच्या स्थिर, विश्वासार्ह आणि नियोजनबद्ध वाढीच्या धोरणाचा भाग आहे. आमचे मुख्य लक्ष भारताशी खरी आणि अर्थपूर्ण जोड निर्माण करण्यातचे आहे,” असे फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चको यांनी सांगितले.
उडाण ५.० अंतर्गत सध्या सुरू असलेल्या सिंधुदुर्ग, जळगाव आणि अगत्ती या केंद्रांना बेंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि गोवा यांसारख्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या सेवांना आणखी विस्तारणार आहे. फ्लाय९१चे आगामी लक्ष्य देशभरातील ५० हून अधिक शहरांना सेवा देणं आहे. तसेच, येत्या पाच वर्षांत ३० एटीआर विमानं फ्लीटमध्ये समाविष्ट करण्याचा उद्देश आहे. यासाठी, विविध प्रादेशिक केंद्रांवर आधारित नवीन विमानसेवा सुरू करण्याची योजना फ्लाय९१ने आखली आहे.