तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव थाटात झाला संपन्न

तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव थाटात झाला संपन्न

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव सोमवारी 28एप्रिल 2025 रोजी थाटात संपन्न झाला.

श्री देव दाळकर देवाचा जत्रौत्सवला सिंधुदुर्ग जिल्यातील भक्तगणांबरोबर गोवा, कोल्हापूर, मुंबई, पुणे बेळगाव तसेच महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविकानी या जत्रोत्सवाला गर्दी केली होती.

त्यामुळे या जत्रौत्सवला मोठ्या प्रमाणांत भाविकानी गर्दी झाली होती. यावेळी योग्य नियोजन श्री बबन उर्फ बंड्या परब व कुटुंबीय मित्रंमंडळ यांच्यामार्फत करण्यात आले होते.
या जत्रौत्सव निमित्त विविध धार्मिक व नाटय प्रयोग तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. .

यावेळी सकाळी धार्मिक कार्यक्रम श्री देव दाळकर देवस्थान ठिकाणी संपन्न झाल्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून दर्शन सुरु झाले. यावेळी रात्रौ भरत खंड अर्थात पंचमृत्यू दंड नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. तर रात्रौ 12वाजता नाईक मोचे माडकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाटय प्रयोग सादर करण्यात आला. यावेळी मोठया प्रमाणात भक्तगण व रसिकवर्ग यांनी यांचा लाभ घेतला. यावेळी मनोकामना पूर्ण झालेल्या भक्तगण यांनी केळीचे घड देवासमोर अर्पण करून आपले नवस फेड केले.
..