सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील जागृत देवस्थान श्री देव दाळकर देवाचा उदया सोमवार 28 एप्रिल 2025 रोजी वार्षिक जत्रौत्सव

तळवडे प्रतिनिधि

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव उद्या सोमवार 28एप्रिल 2025 रोजी संपन्न होत आहे .या श्री देव दाळकर देवाचा जत्रौत्सवला सिंधुदुर्ग जिल्यातील भक्तगणांबरोबर गोवा, कोल्हापूर, मुंबई, पुणे बेळगाव तसेच महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक या जत्रोत्सवाला गर्दी करतात .

त्यामुळे या जत्रौत्सवला मोठ्या प्रमाणांत भाविक गर्दी करत असल्याने याचे चोख नियोजन श्री बबन उर्फ बंड्या परब व कुटुंबीय यांच्यामार्फत करण्यात आले आहे .
या जत्रौत्सव निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

यावेळी सकाळी धार्मिक कार्यक्रम श्री देव दाळकर देवस्थान ठिकाणी संपन्न झाल्यानंतर सकाळी ७ वाजल्यापासून दर्शन सुरु होते . या उत्सव निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रात्रौ भरत खंड अर्थात पंचमृत्यू दंड नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तर रात्रौ 12वाजता नाईक मोचे माडकर यांचा नाटय प्रयोग होणार आहे. तरी भक्तगण व रसिकवर्ग यांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन बबन ऊर्फ बंड्या परब व कुटुंबीय यांनी केले आहे. यावेळी बंड्या परब मित्र मंडळ यानी या उत्सवाचे चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे..