सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी देवी व परिवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा थाटात झाला संपन्न

श्रीदेवी सातेरी देवीच्या दर्शनासाठी हजारो भक्ताने केली होती गर्दी

तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर देवी व परिवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा थाटात झाला संपन्न

रामचंद्र कुडाळकर:-सावंतवाडी

श्री देव सिद्धेश्वर श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी पंचायतनश्री देवी सातेरी देवी व परीवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा थाटात संपन्न झाला.

यावेळी सकाळपासून विवध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर धार्मिक वेळेनुसारश्री देवी सातेरी व परीवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळासोहळा थाटात संपन्न झाला. पुरोहित गावचे देवस्थनाचे मानकरी, सहमनाकरी ,तळवडे ग्रामस्थ, भक्तगण यांच्या उपस्थित हा मगलमय सोहळा संपन्न झाला. या श्रीदेवी सातेरी देवी व परिवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळयाकरिता सकाळपासून भक्तगण यांनी गर्दी केली होती.

तळवडे गावचे श्रीदेवी सातेरी देवीचा कलशारोहण सोहळा व परिवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा गेले ४ दिवस सुरु होता शुक्रवारी २४ एप्रिल 2025 रोजी मोठ्या दिमाखात त्यांचा विवध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात त्याचा समारोप करण्यात आला.या चार दिवसात विविध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे .यावेळी तरंगकाठीसह अवसारी देवताच्या आशिर्वाद ने हा सोहळा संपन्न झाला यावेळी मोठया प्रमाणात भक्तगण यावेळी उपस्थित होते.

या श्री देव सिद्धेश्वर देवी सातेरी पंचायतनातील श्री देव सातेरी पंचायतन व परिवार देवता असलेल्या पाषाणांची पू:प्राणप्रतिष्ठापना सोहळागेले चार दिवस सुरु होता. शेवटच्या दिवशी असख्य भक्तगण यांनी ओठी भरणे ,नारळ ,केळी ठेवणे याकरता गर्दी केली होती . यावेळी या धार्मिक कार्यक्रमला तळवडे पंचक्रोशीतील शिमधडे ढोल ताशांच्या गजरात आले आले होते. त्यामुळे तळवडे परिसर भक्तीमय वातावरणात गजबजून गेला होता.