तळवडे सिद्धेश्वर मंदिरात गुरुवंदना सोहळा थाटात पडला पार!श्री सातेरी उदिन्नाथ क्लासचे संचालक कु.मेहल कांडरकर यांचा तळवडे ग्रामस्थानी केला सत्कार

तळवडे

श्री सातेरी उदिन्नाथ क्लास तळवडे आयोजित  श्री देव सिद्धेश्वर मंदिर तळवडे येथे श्री सातेरी उदिन्नाथ क्लासचे संचालक कु.मेहल कांडरकर पखवाज विशारद आणि शिष्य परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवंदना सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.




 यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन विवध मान्यवर याच्या उपस्थित पार पडले . यावेळी  ३५ ते ४० विद्यार्थ्यांचा एकसंघ मृदुंगनाद, कार्यक्रम संपन्न झाला तर संगीत जुगलबंदी ( बुवा - रुपेंद्र परब बुवा - अमित तांबोळकर ) यांना संवादिनी गजानन मेस्री ,पखवाज मेहल कांडरकर व तबला बंड्या धारगळकर तसेच निवेदक आडेलकर यांनी उत्कृष्ट रित्या सादर केला . यावेळी मोठ्या प्रमाणात रसिका वर्ग उपस्थित होते.यावेळी श्री सातेरी उदिन्नाथ क्लासचे संचालक कु.मेहल कांडरकर यांचा तळवडे ग्रामस्थ याच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तळवडे गावातील जेष्ठ मान्यवर गावकर मंडळी यावेळी उपस्थित होते. यावेळी मृदुंग वादन स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.