ठळक घडामोडी

भक्तीचा महासागर! सोनुर्ली श्री देवी माऊली जत्रोत्सवात हजारो भाविकांकडून ‘लोटांगण’ नवसपूर्ती; ‘प्रतिपंढरपूर’ सोनुर्ली दुमदुमले!

भक्तीचा महासागर! सोनुर्ली श्री देवी माऊली जत्रोत्सवात हजारो भाविकांकडून ‘लोटांगण’ नवसपूर्ती; ‘प्रतिपंढरपूर’ सोनुर्ली दुमदुमले!

रामचंद्र कुडाळकर सावंतवाडी (सोनुर्ली):

दक्षिण कोकणचे ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा दोन दिवसीय जत्रोत्सव यंदाही अभूतपूर्व उत्साहात पार पडला. गुरुवारी रात्री आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष आणि महिला भाविकांनी लोटांगण घालून आपले नवस फेडले आणि शुक्रवारी तुलाभार व देवीच्या कौलानंतर जत्रोत्सवाची सांगता झाली.रात्री ११ वाजता लोटांगणाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात
लोटांगणाच्या जत्रोत्सवाला गुरुवारी रात्री आठ नंतर भाविकांच्या जनसागराचे स्वरूप आले. मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. पालखी आगमन: रात्री ठिक १०.३० वाजता देवीची पालखी कुळघराकडून वाजत-गाजत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिरात दाखल झाली.लोटांगण विधी: विधीवत प्रथेप्रमाणे रात्री ११ वाजता लोटांगणाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.

प्रदक्षिणा:

मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून लोटांगणाला सुरुवात झाली आणि मंदिराला एक पूर्ण प्रदक्षिणा करून ते त्याच पायरीवर पूर्ण करण्यात आले. नवसकरी पुरुष भक्तांनी जमिनीवरून लोटांगणे घातलीमहिलांनी उभ्याने चालत लोटांगणे घालून नवस फेडले.

भक्तीची अनुभूती:

लोटांगण सुरू होताच श्रीदेवी माऊलीच्या अवसारांनी (संचारी) तरंगकिठीसह भक्तांना दर्शन दिले, ज्यामुळे भक्तीमय वातावरणात अधिक भर पडली. हजाराहून जास्त महिला व पुरुष भाविकांनी यावेळी देवीचरणी लोटांगण अर्पण केले.

महत्त्वाची सोय: देवस्थान कमिटीकडून यावर्षी लोटांगण घालणाऱ्या महिला-पुरुषांसाठी नव्याने उभारलेल्या इमारतीमध्ये आंघोळीची खास व्यवस्था करण्यात आली होती.

चोख पोलीस बंदोबस्त!
जत्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेने अत्यंत चोख नियोजन केले होते. खुद्द पोलीस अधीक्षकांनी हजेरी लावली, तर सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी संपूर्ण जत्रोत्सव पार पडेपर्यंत प्रत्येक हालचालीवर जातीनिशी लक्ष ठेवले. दोन तासांहून अधिक काळ पुरुष भक्तांची आणि त्यानंतर महिलांची लोटांगणे अविरत सुरू होती.

दुसऱ्या दिवशी ‘तुलाभार’ व कौल
जत्रेच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी, गावकरी मंडळी आणि केळी कुळांनी देवीच्या दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी केली.
तुलाभार: या दिवशी ‘तुलाभार’ कार्यक्रमालाही गर्दी होती. यात अडीअडचणी असलेल्या भाविकांनी आपल्या वजनाएवढ्या वस्तू देऊन नवस फेडला. बाधा निवारण: पिचाच्छ बाधा झालेल्यांना देवी माऊलीच्या अवसारी संचाराकडून बाधा दूर करण्याचा विधीही पार पडल: दुपारनंतर देवीच्या संचारी अवसाराने जत्रोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याचा कौल दिल्यानंतर या दोन दिवसीय भव्य जत्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली.