राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारेंच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून विविध उपक्रम !माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले


सावंतवाडी
राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे यांचा वाढदिवस १ नोव्हेंबर रोजी होत असून त्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. कोकण विभाग या महिला अध्यक्षा अर्चना घारे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष अँड.सायली दुभाषी, विवेक गवस, नईद मेमन, मनोज वाघमोरे, संदीप परब, वैभव परब आदी उपस्थित होते. यावेळी श्री.भोसले पुढे म्हणाले,
४ डिसेंबरला नौसेना दिनाच्या निमित्ताने मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मुर्मु यांच्या आगमनाने कोकणाला भरभरून मिळेल. देशाच्या नौसेनेचे कार्य मोठे आहे. या उपक्रमाला राष्ट्रीय कार्यक्रमाला आपण शुभेच्छा देतो. त्याचबरोबर हा नौदल दिन म्हणजे कोकणवासीयांसाठी मोठा सोहळा आहे. हा तरुणांना प्रोत्साहन देणारा सोहळा आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान यांच्या येण्याने केंद्र आणि राज्य शासनाकडून भरभरून मदत मिळेल. असेही ते म्हणाले.