न्हावेलीतील आकाशकंदील स्पर्धेत सुचिता कारिवडेकर प्रथम तर रेकॉर्ड डान्स स्पर्धेत जयेश सोनुर्लेकर


न्हावेली / वार्ताहर
दिवाळी पाडव्यानिमित्त न्हावेलीतील चौकेकरवाडी येथे पार पडलेल्या आकाशकंदील व रेकॉर्ड डान्स स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
आकाशकंदील स्पर्धेत मळेवाड येथील कु.सुचिता सचिन कारीवडेकर चा प्रथम क्रमांक,अणसुर येथील श्री.प्रमोद विश्राम गावडे द्वितीय क्रमांक,तर सौ.प्रेरणा प्रमोद गावडे यांचा तृतीय क्रमांक आला आहे.
आकाशकंदील स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिगंबर मोर्ये यांनी काम पाहिले.
रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटात तुळस येथील कु.दिशम परब याचा प्रथम क्रमांक , तर सावंतवाडी येथील कु. सोहम जांभोरे द्वितीय क्रमांक व अणसुर येथील अभंग रगजी याचा तृतीय क्रमांक आला.
तर मोठ्या गटातून वेंगुर्ले येथील जयेश सोनुर्लेकर याचा प्रथम क्रमांक तर नंदीनी बिले हिचा द्वितीय तर इन्सुली येथील नेहा जाधव हिचा तृतीय क्रमांक मिळाला.
रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी गौरी बांदेकर, पंकज तिळवे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे सुञसंचलन आदीत्य निर्गुण व वामन राऊळ यांनी केले.यावेळी बक्षीस वितरण समारंभाला न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर,त्रिंबक आजगावकर,आकाश निर्गुण,नारायण नाईक,वैभव चौकेकर,गोविंद मोर्ये,रोहित निर्गुण,सुरेश बोंद्रे, दादा धवण,पुनीत नाईक,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
