ठळक घडामोडी

कोकण रेल्वे प्रश्नांवर पालकमंत्री ना. नितेश राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा!कोकणातील स्थानकांच्या आधुनिकीकरणाची मागणी

कोकण रेल्वे प्रश्नांवर पालकमंत्री ना. नितेश राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

कोकणातील स्थानकांच्या आधुनिकीकरणाची मागणी

१६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे वाढवण्याचा प्रस्ताव

कणकवली व नांदगाव येथे गाड्यांचे थांबे अपेक्षित

प्रवासी सुविधा व पीआरएस काउंटर उन्नतीकरणावर भर

वैभववाडी–कोल्हापूर नव्या मार्गाला गती देण्याची ग्वाही

सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी)

दिल्ली येथे सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत कोकण व सिंधुदुर्गातील महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

कोकणातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, सिंधुदुर्ग व परिसरातील स्थानकांवर १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे, कोयंबतूर, नागरकोइल व मडगाव एक्सप्रेसचा कणकवली येथे थांबा, तसेच मांडवी एक्सप्रेसचा नांदगाव येथे थांबा याबाबत मागणी करण्यात आली.

याशिवाय, मडुरे व सावंतवाडी येथून विशेष गाड्या सुरू करणे, प्रवासी सुविधा वाढविणे, पीआरएस काउंटर उपलब्ध करणे यांसारख्या मागण्याही नामदार नितेश राणे यांनी मांडल्या. विशेषतः वैभववाडी–कोल्हापूर नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्विनी वैष्णव यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्याची ग्वाही दिली.