

सावंतवाडी मध्ये अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी मध्ये अन्नपूर्णा कोरगावकर यांचा नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी, दि. २५ नोव्हेंबर:
सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार तथा माजी उपनगराध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णा कोरगावकर यांनी शहरात अत्यंत उत्साहाने व जोरदार प्रचार केला आहे. अपक्ष असूनही सावंतवाडीतील जनता त्यांच्यासोबत ठामपणे उभी आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.विकासाच्या मुद्द्यांवर भर
श्रीमती कोरगावकर यांनी सांगितले की, सावंतवाडीतील जनता त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे. नागरिक आता केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला कंटाळले आहेत. ‘रोजगाराच्या केवळ गप्पा’ न मारता, प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या प्रचारात प्रामुख्याने रोजगार निर्मिती आणि विकासाचे मुद्दे अग्रस्थानी असल्याचे दिसून आले.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अन्नपूर्णा कोरगावकर यांनी शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन मतदारांशी संवाद साधला आणि प्रचार केला. त्यांच्या प्रचारात श्री. आचार्य, ऐश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, व्यंकटेश शेट आदींसह त्यांचे असंख्य समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेचा मिळत असलेला भरघोस प्रतिसाद अन्नपूर्णा कोरगावकर यांना मिळत आहे, असे सांगितले जात असून, त्यांच्या प्रचारामुळे नगराध्यक्षपदाची ही निवडणूक लक्षवेधी ठरत आहे.





