गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कुणकेरी गावात करण्यात आले भव्य स्वागत


सावंतवाडी । प्रतिनिधी
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कुणकेरी गावात भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले सभापती असताना मी माझ्या गावी कुलदेवतेच्या दर्शनासाठी आलो होतो. आता मुख्यमंत्री झाल्यावर मी आलो आहे. आज योगायोग जुळून आला. माझ्या स्वागतासाठी तुम्ही आलात तुमचे आभार मानतो देवीचे आशीर्वाद घेता आले. त्याच बरोबर आज सगळ्या सावंतांना भेटून आनंद झाला. तुमचं हे प्रेम असचं राहू द्या, असे भावोद्गार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
आपल्या मूळगावी कुणकेरी येथे आलेल्या डॉ. प्रमोद सावंत यांनी कुलस्वामीनी भवानी मातेचे दर्शन घेतले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत-भोसले, माजी सभापती प्रमोद सावंत, सरपंच सोनिया सावंत, पोलिस पाटील तानाजी सावंत, विश्राम सावंत आदी उपस्थित होते
पंतप्रधान मोदींचं व्हिजन विकसित भारताचं आहे. त्यामुळे गावागावाचा विकास करून घेण्यासाठी ही संधी आहे. राज्य सरकारकडून याचा फायदा करून घेत विकास साधावा, असं आवाहन त्यांनी भाजपचे माजी आमदार राजन तेली व भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना केले.