मंत्री दीपक केसरकरांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सावंतवाडी दौऱ्यावर

सावंतवाडी:

विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही सभा आज शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी १ वाजता गांधी चौक, सावंतवाडी येथे पार पडणार असून या सभेला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.