सर्वसामान्यांच्या उमेदवार अर्चना घारे यांनी केळुस येथील प. पू. श्री नामदेव महाराज समाधी मठाला भेट देत समाधी स्थळाचे घेतलें दर्शन


वेंगुर्ला
सर्वसामान्यांच्या उमेदवार अर्चना घारे यांचा गावभेट दौरा सुरू असताना त्यांनी केळुस येथील परम पूज्य श्री नामदेव महाराज समाधी मठाला भेट देत समाधी स्थळाचे दर्शन घेतले. अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब या सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग, तालुक्यातील गावागावात आपला प्रचार दौरा करत आहे .यावेळी त्या प्रत्येक गावातील देवस्थान भेट देत देवतांचे दर्शन घेत आहे. यावेळी केळुस गावात गेले असता परमपूज्य श्री नामदेव महाराज यांच्या समाधी मठाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
