अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांच्या प्रदर्शनाचं झाले उद्घाटन


सिंधुदुर्गला वाचन संस्कृती टिकवण्याची गरज असताना अर्चना घारेंनी वाढदिवसानिमित्त घेतलेला उपक्रम स्तुत्य! ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत
अर्चना फाऊंडेशन व पुस्तक विश्वच्या सहाय्याने आयोजन
सावंतवाडी
आज सिंधुदुर्ग जिल्यात वाचन संस्कृती टिकवण्याची गरज असताना अर्चना घारेंनी वाढदिवसानिमित्त घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. राजकारणापेक्षा समाजकारणात रस असणारे राजकारणी कमी दिसतात. अर्चना घारे मात्र याला अपवाद असून त्या समाजकारणाला प्राधान्य देत आहेत. त्यांच्या बोलण्यातून राजकारणातून लुप्त होत चाललेला सुसंस्कृतपणा दिसतो. वाचन हे सांगून होत नाही ते रक्तात भिनाव लागत. वाचाल तरच वाचाल अशी आज स्थिती असून नव्या पिढीने वाचनावर भर द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांनी केले.
राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या वाढदिवसानिमित्तअर्चना फाऊंडेशनच्यावतीने व पुस्तक विश्वच्या सहकार्यानं भव्य पुस्तक आणि वैज्ञानिक खेळण्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन सावंतवाडीतील नारायण मंदिर येथे करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं.याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षअमित सामंत, ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, साहित्यिक प्रा. गोविंद काजरेकर, साहित्यिका डॉ. शरयु आसोलकर, मालवणी कवी दादा मडकईकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकूल पार्सेकर, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, संदीप घारे,राष्ट्रवादी कॉग्रेस सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी,रेवती राणे, , देवेंद्र टेमकर, पुजा दळवी, हिदायत खान, सावली पाटकर, बावतीस फर्नांडिस आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.सफर पुस्तकांच्या दुनियेतील’ या उपक्रमात तब्बल आठ हजार पुस्तकांचा संग्रह या ठिकाणी असून १२ डिसेंबर पर्यंत भव्य प्रदर्शन व विक्री होणार आहे. १ ते १२ डिसेंबर पर्यंत भव्य पुस्तक प्रदर्शनाच आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत या प्रदर्शनचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळें याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
‘