राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत साजरा,


२०२४ चा वाढदिवस आमदार म्हणून साजरा करू, महिला आमदार सिंधुदुर्गातून विधानसभेत पाठवत इतिहास घडवू!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अमित सामंत



सावंतवाडी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना अर्चना घारेंना शुभेच्छा दिल्या. २०२४ चा वाढदिवस आमदार म्हणून साजरा करू, महिला आमदार सिंधुदुर्गातून विधानसभेत पाठवत इतिहास घडवू अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ताईंचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाहत्यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, शरद पवार व सुप्रिया सुळे यांची निवड चुकलेली नाही. पवारांची निवड ही योग्यच असते. त्यामुळे २०२४ ला आमदार म्हणून अर्चना घारेंना निवडून देत इतिहास घडवू, महिला आमदार विधानसभेत पाठवू असं मत त्यांनी व्यक्त केलं.तर जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, अर्चना घारे या माझ्या लहान बहीणीसारख्या आहेत. त्यांच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं जिल्हाध्यक्ष म्हणून करणार. मागील वेळेस आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो नाही. पण, त्या खचल्या नाहीत. सतत काम करत राहिल्या. सत्ता असो वा नसो त्यांचा मतदारसंघातील झंझावात त्यांनी कायम ठेवला.
तुमचं प्रेम, तुमच्या शुभेच्छा यामुळे माझ्यावरची जबाबदारी आणखीन वाढली!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब
यावेळी अर्चना घारे-परब यांनी उपस्थितांचे आभार मानले. आज तुम्हा सर्वांचं प्रेम पाहून मन भरून आलं आहे. तुम्ही दिलेल्या शुभेच्छांची शब्दांत तुलना करता येणार नाही. अनेक प्रश्न इथे आहेत. ते मार्गी लावण्यासाठी माझा भर असणार आहे. तुमचं प्रेम, तुमच्या शुभेच्छा यामुळे माझ्यावरची जबाबदारी आणखीन वाढली आहे. येत्या १२ डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस होता आहे. या निमित्ताने १ ते १२ डिसेंबर पर्यंत विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवित आहोत. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असं आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, आत्माराम ओटवणेकर, बाळ कनयाळर, संदीप गवस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, समीर वंजारी, बाळ चमणकर, राजन म्हापसेकर, रेवती राणे, सायली दुभाषी, सागर नाणोसकर, विशाल जाधव, सुदेश आचरेकर, दिपीका राणे, देवेंद्र टेमकर, सावली पाटकर, योगेश कुबल, जयप्रकाश खानोलकर, रशीद शेख, नईम मेमन, सचिन पाटकर, संदीप घारे, पुजा दळवी, विनायक परब आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.