माणगाव येथे गणपती रेखणी कार्यशाळा

माणगाव येथे गणपती रेखणी कार्यशाळा


कुडाळ ः

माणगाव येथील सुप्रसिद्ध श्री दत्त मंदिराजवळ गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणपतीच्या रेखणीची कार्यशाळा होणार आहे. दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.३० ते ५ वाजेपर्यंत ही कार्यशाळा होईल. या कार्यशाळेत रेखणीतील बारकावे प्रात्यक्षिकांसह दाखविले जातील. तसेच गणपतीच्या संदर्भातील बॉडी कलर, रंगसंगती व इतर माहिती सविस्तर सांगण्यात येईल.
सदर कार्यशाळा ही माणगावातील कलाशिक्षक सेलेस्तीन शिरोडकर हे घेणार आहेत. त्यांना सुमारे ४५ वर्षे या कामाचा अनुभव आहे. कार्यशाळा पोस्टर आणि ॲक्रॅलिक रंग माध्यमातून होईल. सहभागी होणाऱ्यांनी मध्यम आकाराची बॉडीकलर आणि शेडिंग केलेली एक गणपतीची डोकी आपल्याबरोबर आणावी. तसेच रंग साहित्यही आणावे.
कार्यशाळेच्यावेळी नाष्टा व जेवणाची सोय असेल. इच्छुकांनी ९४०३०९९५४३, ९४२०६५६१४६ या क्रमांकावर नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा. नावनोंदणी दि. ९ ऑगस्ट २०२४ पर्यंत करता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे. ः