संस्कार नॅशनल स्कूल निरवडेत पालकदिन उत्साहात साजरा

सावंतवाडी
संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेत पालक दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये विवध उपक्रम राबविले.

पालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त प्रशालेमध्ये प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विविध उपक्रम,स्पर्धा व मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले होते. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांनी यात मोठ्या उत्साहाने सहभाग दर्शविला.

पालकांमधील उत्साह,ऊर्जा व सकारात्मक दृष्टिकोन यामुळे प्रशालेचे वातावरण चैतन्यमय झाले होते. यावेळी व्यासपीठावर पालकांनी विवध सामाजिक हित याच्या दृष्टीने कार्यक्रम साजरे केले.

पालक दिनाच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख सौ. नेहा भिसे यांच्या हस्ते शारदा मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक. हेमंत तानावडे सर यांच्या हस्ते प्रमुख अतिथी सौ. नेहा भिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. शेखर जैन सर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत तानावडे सर यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम पालकांसाठी आयोजित करण्यात आलेले होते. यात पालकांनी सहभाग घेऊन मनमुराद आनंद लुटला. पुन्हा एकदा बालपण जगण्याचा अनुभव सर्व पालकांनी या दिनानिमित्त घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेतील सहाय्यक शिक्षक . मनिष सावंत सर यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची सर्व धुरा प्रशालेतील पालक श्री. शंकर पणशीकर व सौ राधिका पणशीकर या पालकांनी आपल्या समर्थ खांदयावर उचलली. विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व पालकांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
बालपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा
या ओळी खरोखरच प्रत्यक्षात प्रशालेच्या आवारात उपस्थित सर्वांना अनुभवता आल्या. पालकांनीही विविध मनोरंजनात्मक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन पुन्हा एकदा आपलं बालपण जगण्याचा अनुभव त्यांनी घेतला. संस्थेचे चेअरमन डॉ. शेखर जैन सर यांनी या दिनाचे औचित्य साधून सर्व पालकांना, शिक्षकांना व विद्यार्थ्यांनाही पालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. हेमंत तानावडे सर यांनीही सर्व उपस्थित पालकांचे शब्द सुमनानी कौतुक करून उपस्थित पालकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाची सांगता प्रशालेतील सहाय्यक शिक्षिका श्रीमती हर्षदा खवणेकर मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून केली.