उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष यास सभेची परवानगी असताना पणं प्रशासनावर दबाव टाकून त्या ठिकाणी लावली राणेंची सभा !मंत्री दिपक केसरकर यांच्यावर उबाठा शिवसेना तालुका प्रमूख रुपेश राऊळ याची टिका


यावंतवाडी
आमची आजच्या सभेला देखील गांधी चौकात परवानगी असताना देखील केसरकर यांनी प्रशासनावर दबाव आणून त्या ठिकाणी राणेंची सभा लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केसरकर यांचा थंड दहशतवाद हा जनतेसमोर उघड झाला आहे असा आरोप उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला. केसरकर हे एवढे कंटाळलेले आहेत की त्यांना आता रडीचे डाव खेळल्याशिवाय त्यांना जमत नाही त्यामुळे केसरकर यांनी मागून वार करण्यापेक्षा आमने-सामने येऊन आमच्याशी लढावे असे आव्हान देखील शिवसेना तालुकप्रमुख श्री रुपेश राऊळ यांनी दिले. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत रुपेश राऊळ हे बोलत होते.