लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करणार ! शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर

सावंतवाडी

लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव करुन खासदार विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करून केंद्रात येणाऱ्या इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्री असल्याचे उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे शिवसेना प्रमुख संदेश पारकर यांनी सावंतवाडी येतील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

माझी राणे यांच्या प्रवृत्ती बरोबर लढाई सुरू आहे ती सोडलेली नाही राणे त्यावेळी काँग्रेसमध्ये आले होते त्यामुळे त्यांच्याशी तडजोड करावी लागली. ही राणेशी तडजोड नव्हती तर काँग्रेसच्या विचारधारेशी तडजोड होती . त्यांच्याशी तात्विक विरोध सुरू होता. मंत्री दिपक केसरकर लोकसभा निवडणुकीनंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे ,त्यांचेही राजकीय नुकसान होणार आहे. केसरकर राणेंच्या दहशतीच्या विरोधात आवाज उठवत होते . परंतु कुणाच्या दबावामुळे त्यांनी मिठी मारली हे समजत नाही त्यांचा जनाधार संपल्यामुळे कदाचित नारायण राणे बरोबर मंत्री दिपक केसरकर यांनी जवळीक साधली आहे परंतु सावंतवाडीच्या जनतेला त्यांची ही भूमिका पटलेली नाही . त्यामुळे या निवडणुकीत राणेंच्या विरोधात मतदान करून सावंतवाडी मतदारसंघातील जनता केसरकर यांना प्रत्युत्तर देणार आहे असेही पारकर म्हणाले.