कॅबिनेटमंत्री नितेश राणे यांचे खारेपाटण येथे जल्लोषात स्वागत!भव्य पुष्पहार सहित,दोन क्रेन,51जेसीबी मधून नितेश मंत्री राणे यांच्यावर फुलांचा वर्षाव

हजारोच्या संख्येने जनसमुदाय खारेपाटण येथे मंत्री राणे याच्या स्वागतासाठी उपस्थित

सिंधुदूर्ग

राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दाखल झाले. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्याने त्यांचे भव्य असे जंगी स्वागत खारेपाटण येथे करण्यात आले. हजारो च्या संख्येने भाजपा, महायुती तसेच सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी खारेपाटण येथे मंत्री राणे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्याच्या प्रवेशद्वारावर ढोल पथक, 51जेसीबी फुलांनी भरून, भव्य असा पुष्पहार कॅबिनेट मंत्री राणे यांच्या स्वागतासाठी तयार होते. मंत्री राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात एंट्री होताच त्याच्या स्वागतासाठी भव्य असा पुष्पहार त्यांना अर्पण करण्यात आला. ढोल तश्याच्या गजरात 51 जेसीबी मधून फुलांचा वर्षाव मंत्री राणे यांच्यावर करण्यात आला. गुलाब पुष्पाने रस्त्यावर सजावट करण्यात आली होती. तसेच महिलानी सर्व नऊवारी साडी परिधान करून नितेश राणे यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावर कॅबिनेट मंत्री यांचा खारेपाटण ग्रामपंचायत,खारेपाटण व्यापारी, जिल्हा भाजपा, सर्व शक्तिकेंद्र प्रमुख, सर्व सरपंच, वैभववाडी भाजपा चे कार्यकर्ते, पदाधिकारी, खारेपाटण सह वा्यंगणी, शिडवणे, शेर्पे, नडगीवे, कुरंगवणे, वारगाव, चिंचवली, साळीस्ते,ग्रामपंचायत च्या वतीने देखील मंत्री राणे यांचे स्वागत करण्यात आले. वारकरी संप्रदाय च्या वतीने देखील मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला.


खारेपाटण पंचक्रोशी मधील सर्व भाजपा, महायुती चे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व ग्रामस्थ यांच्या कडून तसेच सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा च्या वतीने खारेपाटण येथे नेत्र दीपक असे स्वागत खारेपाटण येथे करण्यात आले.
कॅबिनेट मंत्री राणे यांच्या स्वागतासाठी उपस्थित जिल्ह्यातील सर्वच भाजपा, महायुती, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, भाजपा महिला वर्ग, महायुती चे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या कडून कॅबिनेट मंत्री राणे यांचे स्वागत करण्यात आले.कॅबिनेट मंत्री यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्वागताच्या तयारी साठी जिल्ह्यातील सर्वच भाजपा, महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी अतिशय सुंदर अशी स्वागताची तयारी करून कॅबिनेट मंत्री राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेश द्वार खारेपाटण येथे नेत्रदीपक अश्या प्रकारे खारेपाटण येथे स्वागत केले.