राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

कणकवली

महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे २२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहेत. मंत्री झाल्यानंतर नितेश राणे हे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी जिल्हा भाजपा कडून करण्यात येत आहे.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात मंत्री नितेश राणे यांचा नागरी सत्कार केला जाणार असून, जिल्हा भाजपाच्या वतीने होणाऱ्या या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे. या स्वागताच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात जागोजागी मंत्री नितेश राणे यांच्या स्वागताचे मोठे लागले आहेत.भारतीय जनता पार्टीच्या वतीने कणकवली येते नागरी सत्कार केला जाणार आहे. महायुती मधील घटक पक्ष देखील या स्वागत सोहळ्यास सहभागी होणार आहे.