शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर युवक युवतींच उपोषण अखेर मागे


शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या आश्वासनानंतर युवक युवतींच उपोषण अखेर मागे
ठाकरे शिवसेना पदाधिकारी यांनी दिला आंदोलनास पाठिंबा
मंत्री दिपक केसरकर यांच्या निवास स्थानासमोर छेडले होते आंदोलन
सावंतवाडी
सावंतवाडी येतील शहरातील एका डाटा कंपनीकडून तेथे काम करणाऱ्या काही युवक युवतींचा तीन महिन्याचा पगार रखडविल्यामुळे आज संबधित युवक युवतींनी ठाकरे सेनेच्या माध्यमातून मंत्री दिपक केसरकर यांच्या निवास स्थानासमोर आंदोलन छेडले. मंत्री केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी या आंदोलनास ठाकरे शिवसेना पदाधिकारी यांनी पाठिंबा दर्शवला होता. ठाकरे शिवसेना सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा प्रमूख रुपेश राऊळ, मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार यावेळी उपस्थित होते.
