

47 वर्षानंतर मळगाव इग्लिश स्कूल मळगाव शाळेच्या इयत्ता दहावीच्या मुलांचा गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न
47 वर्षानंतर मळगाव इग्लिश स्कूल शाळेच्याइयत्ता दहावीच्या मुलांचा गेट टुगेदर कार्यक्रम
सावंतवाडी
जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शालेय जीवन कसे जगलो यांची खरी आठवण करुन देते.29 जून 2025 रोजी नरेंद्र सृष्टी मळगाव येथे मळगाव इंग्लिश स्कूल च्या १९७८_७९ मधील इयत्ता दहावीच्या मुलानी ४७ वर्षा नंतर मोठ्या उत्साहात एकत्र येऊन गत आठवणीना उजाळा दिला.
सर्व शारीरिक दुखापतींचा विसरून उत्साहाने व आनंदाने दिवस साजरा केला. प्रथम ज्येष्ठ वर्गमित्र पुरोहित श्री मिलिंद जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढ वून कार्यक्रम चे उद्घाटन करण्यात आले.त्यानंतर सर्व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले या बॅच मधील दिवंगत वर्ग मित्र मैत्रिणी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

जीवनाच्या प्रवासाचे वर्णन करत असताना काहींचे अश्रू झाले अनावर
या प्रसंगी २६ विद्यार्थी व शिक्षक श्री शशिकांत साळगावकर उपस्थित होते ,प्रत्येकाने आपला परिचय देताना शालेय जीवनातील आठवणीना उजाळा तर दिलाच पण १० वी नंतर आपण कसे बनलो जीवन कस व्यथित केले.याची आठवण करून दिली. जीवनाच्या प्रवासाचे वर्णन करत असताना काहींचे अश्रू अनावर झाले.पण सर्व मित्र एवढ्या वर्षात भेटले याचा आनंदही होता. निसर्गाच्या सानिध्यात धबधब्यावर हिरवागार वनराईत सर्वांनी मनमुराद आनंद घेतला.याप्रसंगी काहींनी गाणी, नक्कल,जोक सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.. श्री उदय मुळीक ,श्री दिनेश खानोलकर, ,सौ अंजनी मेस्त्री हे सर्व हे खास मुंबई वरून आले होते. त्याचं स्वागत करण्यात आलं. मळगाव इग्लिश स्कूल शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी यांनी कार्यक्रम ला भेट देऊन संघटनेचे सभासद होण्याचं व शाळेला मदत करण्याचं आवाहन केले.शेवटी सर्वांचे आभार श्री लऊ कुडव यांनी मानले कार्यक्रम चे. सूत्र संचलन प्रा. ॲड.श्री गणपत शिरोडकर व श्री रामनाथ यांनी केले .हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्री दिवाकर सातार्डेकर,श्री उदय हरमलकर श्री लऊ कुडव श्री रामनाथ राऊळ व प्रा.गणपत शिरोडकर यांनी विशेष मेहनत घेतली.





