ठळक घडामोडी

एक पृथ्वी, एक स्वास्थ्य करिता योग’ या विषयानुसार जिल्ह्यातील 05 ठिकाणी आयोजित योग शिबीरास प्रतिसाद!संत निरंकारी मिशन मार्फत आंतर्राष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून संयुक्त राष्ट्र संघाने केलें होतें आयोजित

‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य करिता योग’ या विषयानुसार जिल्ह्यातील 05 ठिकाणी आयोजित योग शिबीरास प्रतिसाद

सावंतवाडी, 21 जून, 2025 –

संत निरंकारी मिशन मार्फत आंतर्राष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून संयुक्त राष्ट्र संघाने जाहिर केलेल्या ‘एक पृथ्वी, एक स्वास्थ्य करिता योग’या विषयानुसार संपूर्ण मानवतेला हा संदेश मिळतो, की व्यक्तीचे वास्तविक स्वास्थ्य तेव्हाच पूर्ण मानले जाते जेव्हा ती शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक दृष्टीने संतुलित व जागरुक असेल. हाच उद्देश्य केंद्रीभूत मानून निरंकारी मिशन आपल्या आध्यात्मिक व सामाजिक प्रयत्नांच्या अंतर्गत योगाला समग्र कल्याणाचे माध्यम मानत निरंतर प्रयासरत आहे.


सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने वेंगुर्ले, तळवडे येथे आयोजित तीन दिवसीय शिबिरादरम्यान बोलताना श्री विद्याधर पाटणकर, मुख्य योग शिक्षक पतंजली युवा भारत संस्था, सावंतवाडी म्हणाले की जशी शरीर तंदुरुस्तीसाठी व्यायामाची गरज आहे त्याचप्रमाणे मनाच्या तंदुरुस्तीसाठी प्राणायमची गरज आहे. जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक ऊर्जा फार महत्त्वाची आहे त्यासाठी आजच्या धावपळीच्या जीवनात योग साधना करणे फार गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संत निरंकारी सत्संग भवन, नियोजित जागेशेजारील निरंकारी सत्संग हॉल, ओरोस ता. कुडाळ, फॉरेस्ट कॉलोनी जवळ, ख्रिश्चनवाडी, सातपुते निवास, माजगाव,ता. सावंतवाडी, शिवशक्ती हॉल, कनकनगर, ता.कणकवली, मोहूळवाडी, तिर्लोट, ता.देवगड तसेच देशभरातील 1000 पेक्षा जास्त ठिकानांवर एकाच वेळी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित देशव्यापी योग शिबीर संपन्न झाले. विविध ठिकाणी आयोजित या योग शिबिरात जिल्ह्यातील शेकडो तर देशभरातील लाखो निरंकारी भक्तांनी लाभ घेतला.