सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रात AI च्या माध्यमातून भविष्यात मोठ्या प्रमाणात क्रांती!सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा जिल्हा परिषदनिहाय आढावा
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व थांब्याचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील : ना. नितेश राणे
सिंधुदुर्गाच्या शैक्षणिक क्षेत्रात Al च्या माध्यमातून भविष्यात मोठ्या प्रमाणात क्रांती
सावंतवाडी
केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची मी अलीकडेच भेट घेतली. यावेळी जिल्हाभरातील प्रवासी संघटनेकडून दिले गेलेले निवेदन माझ्याकडे होते. सावंतवाडी टर्मिनसचा विषयही त्यात प्रामुख्याने होता. तसेच जिल्हाभरातील रेल्वे स्थानकांवर रेल्वेचे थांबे वाढविण्यासाठी मी मागणी केली आहे. रेल्वेमंत्री अनुभवी असून मार्ग काढणारे आहेत. खासदार म्हणून नारायण राणे तिथे आहेत. पालकमंत्री म्हणून मी पाठपुरावा करत आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे त्यामुळे निश्चितच हे सर्व प्रश्न सुटतील, असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिक्षण क्षेत्रात विविध पद्धतीने प्रयोग ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या माध्यमातून होत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आज अमेरिकेतील शिक्षक जिल्हाभरातील मुलांना शिक्षण देऊ शकतो अशी यंत्रणा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण देण्याचे विविध मार्ग AI च्या माध्यमातून उपलब्ध असून जिल्हा, राज्य पातळीवर आम्ही याचा अभ्यास करत आहोत.
शिक्षण क्षेत्रात विक्रांत सावंत यांच्यासारखे सहकारी मोठ्या पदावर येत असल्याने सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रात भविष्यात निश्चितच मोठ्या प्रमाणात क्रांती होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आगामी जिल्हा परिषद (जि.प.), पंचायत समिती (पं.स.) तसेच नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात येत असून, कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते सर्वाधिक आहेत. खासदार भाजपचे असून मी स्वतः पालकमंत्री आहे. जिल्हयातून खासदार नारायण राणे यांना लोकसभेत ९५ टक्के मतदान होते. या सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. प्रत्येक पक्षाला स्वतःची ताकद वाढवण्याचा आणि आत्मपरीक्षण करण्याचा अधिकार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक होत असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची आज आढावा बैठक पार पडली. यावेळी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील परिस्थितीचा जिल्हा परिषदनिहाय अभ्यास केला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट आमचे होते. प्रदेशसह वरिष्ठांना जिल्हयातील परिस्थिती कळवू, पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय देतील त्यानुसार निवडणूक लढवू अशी माहिती त्यांनी दिली.
रस्त्यांवरील खड्डे: सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून काम सुरू
दरम्यान, सध्या पाऊस अधिक प्रमाणात असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यासंदर्भात मार्ग काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व आम्ही करत आहोत. जनतेने थोडी साथ दिली तर निश्चितच परिस्थिती बदलेल. खड्डे ही नाही अशी स्थिती नाही. मात्र, पावसाळे संपल्यावर हे खड्डे पुन्हा बुजवले जातील, असेही त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष महेश सारंग यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद (जि.प.), पंचायत समिती (पं.स.) तसेच नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक घेण्यात येत असून, कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते सर्वाधिक आहेत. खासदार भाजपचे असून मी स्वतः पालकमंत्री आहे. जिल्हयातून खासदार नारायण राणे यांना लोकसभेत ९५ टक्के मतदान होते. या सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. प्रत्येक पक्षाला स्वतःची ताकद वाढवण्याचा आणि आत्मपरीक्षण करण्याचा अधिकार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक होत असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची आज आढावा बैठक पार पडली. यावेळी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील परिस्थितीचा जिल्हा परिषदनिहाय अभ्यास केला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे उद्दिष्ट आमचे होते. प्रदेशसह वरिष्ठांना जिल्हयातील परिस्थिती कळवू, पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय देतील त्यानुसार निवडणूक लढवू अशी माहिती त्यांनी दिली.
रस्त्यांवरील खड्डे: सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून काम सुरू
दरम्यान, सध्या पाऊस अधिक प्रमाणात असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यासंदर्भात मार्ग काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व आम्ही करत आहोत. जनतेने थोडी साथ दिली तर निश्चितच परिस्थिती बदलेल. खड्डे ही नाही अशी स्थिती नाही. मात्र, पावसाळे संपल्यावर हे खड्डे पुन्हा बुजवले जातील, असेही त्यांनी नमूद केले.