

सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावचे दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊलीचा भव्य लोटांगण जत्रोत्सव उद्या ६ नोव्हेंबर २०२५ रोजी

दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊलीचा भव्य लोटांगण जत्रोत्सव उद्या
सावंतवाडी
दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देवी सोनुर्ली माऊली जत्रोत्सव उद्या 6 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे या जत्रा उत्सवाची तयारी जयंत करण्यात आली आहे.
उद्या लाखो भावीक श्री देवी माऊलीचे दर्शन घेण्यासाठी दाखल होणार आहेत .यावर्षी वाहन चालकांसाठी पार्किंग व्यवस्था भव्य स्वरूपात करण्यात आली असल्याने कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही.
जत्रोत्सवचे नियोजन चोख करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे न्हावेली मार्गे सोनुर्ली माऊली मंदिर कडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर यावर्षी व्यापारी वर्गाला बसता येणार नाही कारण सोनुर्ली माऊली मंदिर च्या पाठीमागे जवळच पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे चार चाकी व दुचाकी वाहन चालक त्या मार्गे येणार असल्याने कोणत्याही प्रकारचा अडथळा न होण्यासाठी या ठिकाणी व्यापारी बंधूंना बसता येणार नाही त्यांना अन्य व्यवस्था करण्यात आली आहे याची व्यापारी बांधवांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे. एसटी बस सेवा मार्ग त्याच मार्गे असणार असून पूर्वी ज्या ठिकाणी बस स्टॉप आहे त्या ठिकाणी सर्व एसटी महामंडळाच्या गाड्या थांबणार आहेत. सोनुर्ली माऊली देवस्थान कमिटी, गावकर मंडळी, माऊली भक्तगण, ग्रामस्थ,पोलीस प्रशासन ,आरोग्य व्यवस्था, विद्युत महामंडळ कर्मचारी, या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा नियोजनबद्ध यशस्वी करण्यात येणार आहे. येणाऱ्या भक्तगणांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची दखल घेण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भक्तगणाबरोबर गोवा कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो भावी या देवीच्या भव्य लोटांगण सोहळ्याला खरेदी करतात अनेक भक्तगण यांच्या मनोकामना पूर्ण होतात असे महिला व पुरुष भक्तगण घालून आपले नवस फेडतात हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी यावेळी या जत्रोत्सवाला होते हा जत्रोत्सव दोन दिवस चालतो त्यामुळे सोनुर्ली गावात दोन दिवस भक्तगणांची वर्दळ चालू असते असे या भव्य दिव्य सोहळ्याला भक्तगणांनी लाभ घ्यावा असे आव्हान देवस्थान कमिटी व गावकर मंडळी यांच्यातर्फे करण्यात आले आहे






