विधानसभा निवडणुकीत कोकण विभागातील महायुतीच्या 39 पैकी 35 जागा निवडून आणणारे रवींद्र चव्हाण यांचे वेंगुर्ला तालुका भाजपा तर्फे करण्यात आले अभिनंदन

वेंगुर्ला


विधानसभा निवडणुकीत कोकण विभागातील महायुतीच्या 39 पैकी 35 जागा निवडून आणणारे किंगमेकर पालकमंत्री मा.रवींद्रजी चव्हाण यांचे वेंगुर्ला तालुका भाजपा तर्फे अभिनंदन करताना तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई, तालुका सरचटणीस प्रशांत खानोलकर जेष्ठ नेते राजु राऊळ ,कोकण विभागातील पालघर ते सावंतवाडी अशा 39 विधानसभांची जबाबदारी रविंद्र चव्हाण यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती ,आणि पायाला भिंगरी लावून त्यांनी प्रचार केला तसेच बंडखोरी मोडून काढत भाजपा सहित मित्र पक्षांचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणण्यात सिंहाचा वाटा रवींद्रvचव्हाण होता. प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी जशी रवींद्र घेतात तशाच पद्धतीने विजयाचे श्रेय सुद्धा त्यांना द्यावे यासाठी कार्यकर्त्यांनी मुंबई येथील शासकीय निवासस्थान ” रायगड ” येथे घेतलेली ही भेट होती. अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई, यांनी दिली.