

वजराट नंबर 1 शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेतील वजराट पॅटर्नचा चौकार
वजराट नंबर 1 शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेतील वजराट पॅटर्नचा चौकार
ग्रामीण गुणवत्तेचा वजराट पॅटर्न पुन्हा जोमात..
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यांतील शाळा वजराट नंबर 1 चे चार विवद्यार्थी इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय ग्रामीण गुणवत्ता यादीत आले आहेत.यामध्ये कु.स्वरधा अरविंद झेंडे २५४ गुण घेऊन (राज्यस्तरीय ग्रामीण जिल्ह्यात पाचवी,तालुक्यात द्वितीय ) ,कु.नीरज शेखर परब 252 गुण घेऊन (राज्यस्तरीय ग्रामीण जिल्ह्यात नववा, तालुक्यात तृतीय ),कु. माही राजाराम घोंगे 230 गुण ( राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक),पियुषा मिलिंद घोणे 224 गुण (राज्यस्तरीय ग्रामीण शिष्यवृत्तीधारक) तसेच कु. चैतन्य प्रेमानंद सावंतभोसले 204 गुण, कु.गुरुनाथ लवु पेडणेकर 200 गुण,कुमार यश नरेश पाल्येकर 180 गुण हे विद्यार्थी उत्तीर्ण झाल.या सर्व शिष्यवृत्तीधारक मुलांचे तसेच उत्तीर्ण मुलांचे आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन पच्याक्रोधीतुन होत आहे. या मुलांना शाळेतील शिक्षिका श्रीम. रुपाली पाटील , श्रीम.शिल्पाजाभूळकर,मुख्याध्यापक श्री संजय परब , वर्गशिक्षक श्री तेजस बांदिवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
माजी केंद्रप्रमुख श्री लवू चव्हाण तसेच विद्यमान केंद्रप्रमुख श्री विठ्ठल तुळसकर यांनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शेखर परब,श्रीम.निकिता सावंत, श्री लक्ष्मण कांदे, ,श्रीम जान्हवी कांदे सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्,शिक्षक पालक संघ सदस्य,माता पालक संघ सदस्य यांनी अभिनंदन केले. वजराठ गावच्या सरपंच श्रीम अनन्या पुराणिक , उपसरपंच श्री.पेडणेकर ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,गावातील सर्व शिक्षण प्रेमी नागरिक, पालक आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे. ग्रामीण गुणवत्तेच्या या वजराट पॅटर्नला यावेळी शुभेच्या देण्यात आले.






