

होडावडे येथे श्री संत जगनाडे महाराज जयंती सोहळा आज

होडावडे येथे श्री संत जगनाडे महाराज जयंती सोहळा आज
होडावडे (वेंगुर्ला):
वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे या ठिकाणी तेली समाजाचे प्रवर्तक आणि संत शिरोमणी श्री संत जगनाडे महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गशीर्ष कृ. ५ शके १९४७, सोमवार दिनांक ०८ डिसेंबर २०२५ रोजी हा सोहळा सुरू झाला आहे.
सोहळ्याचे ठिकाण: ब्राम्हणदेव मंदिर, (तेलीवाडी भटवाडी), होडावडे, ता. वेंगुर्ला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त तेली समाज बंधू भगिनी, तेलीवाडी भटवाडी, होडावडे यांच्यातर्फे नियोजन करण्यात आले आहे. सोहळ्याची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
| वेळ | कार्यक्रम |
| सकाळी ९.०० वा. | श्री संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन. |
| दुपारी १२.३० वा. | महाआरती. |
| दुपारी १ ते ३ वा. | महाप्रसाद. |
| सायं. ७.३० वा. | कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूळ प्रस्तुत दशावतार नाटक. |
यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक तेली समाजातील सर्व बंधू-भगिनी, मित्रमंडळी आणि आप्तेष्टांना केलें आहे , सहकुटुंब उपस्थित राहून सोहळ्याची शोभा द्विगुणित करावी आणि कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.





