तळवडेत सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर पडलेला भला मोठा पिंपळ वृक्ष अखेर ग्रामस्थ यांनी जेसीबीच्या सह्याने हटवला! मार्ग झाला सुरळीत सुरु

सावंतवाडी

वादळ व मुसळधार पडलेल्या पावसामुळे तळवडे येथे सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर मुरारवाडी या ठिकाणी पिंपळ वृक्ष पडला होता त्यामूळे सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला वाहतूक बंद झाली होती. अखेर ग्रामस्थ यांनी जेसीबीच्या सह्याने हटवला.

भला मोठा पिंपळ वृक्ष पण उन्मळून पडला होता हा पुर्ण वृक्ष वेंगुर्ला सावंतवाडी मार्गांवर पडला होता.त्यामुळे वाहन चालक प्रावाशी यांची प्रवास करताना हाल झाले होते. .त्यामुळे पूर्णपणे वाहतूक बंद झाली होती वाहन चालक व प्रवासी वर्गाचे मोठे समस्या होणारं होती शालेय विदयार्थी याचे पणं नुकसान होणार होते. त्यामुळे तळवडे गावातील ग्रामस्थ यांनी पुढाकार घेऊन हा भला मोठा पिंपळ वृक्ष जेसीबीच्या सह्याने हटवला व मार्ग मोकळा केला .आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. सदर भला मोठा पिंपळ वृक्ष मार्गांवरून दुर करण्यासाठी ४, तास लागले.