तळवडेत सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर पिंपळ वृक्ष पडल्यामुळे सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला वाहतूक बंद तर मुरारवाडी या ठिकाणी किशोर नाईक च्या घरावर आंब्याचे झाड पडले

मुसळधार पाऊस व वादळ यामुळें घडली घटना

सावंतवाडी

सिंधुदूर्ग जिल्ह्यात गेले अनेक दिवस व वादळ,मुसळधार पाऊस पडत आहे.वादळ व मुसळधार पडलेल्या पावसामुळे तळवडे येथे सावंतवाडी वेंगुर्ले मार्गावर मुरारवाडी या ठिकाणी पिंपळ वृक्ष पडल्यामुळे सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला वाहतूक बंद झाली आहे.

भला मोठा पिंपळ वृक्ष पण उन्मळून पडला आहे.त्यामुळे वाहन चालक प्रावाशी यांची प्रवास करताना हाल झाले यामुळें विद्युत पुरवठा पुर्ण खंडित झाला आहे. यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हा रुक्ष पूर्णपणे महामार्ग पडला आहे .

.त्यामुळे पूर्णपणे वाहतूक बंद झाली असून वाहन चालक व प्रवासी वर्गाचे मोठे समस्या झाली आहे तसेच तळवडे या ठिकाणी मुरारवाडी या ठिकाणी किशोर नाईक यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने मोठी अर्थिक हानी झाली आहे. तळवडे गावात दोन दिवसापूर्वी तळवडे मिरीस्थेवाडी या ठिकाणी पण वडाच्या वृक्ष पडला होता.

यात शालेय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता तेवढे गावातील दुसरी घटना घडली आहे सध्या गेले पंधरा दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पूर्ण जागा त्या दलदलीची बनली आहे. त्यामुळे झाडे म्हणून पडत आहे सध्या वारा व पाऊस पडत असल्यामुळे याचा फटका सर्वसामान्य यांना बसत आहे त्यामुळे झाडे म्हणून उन्मळून पडत आहे. हि घटना आज सायकाळी घडली. यावेळी घटना घडल्यावर मोठया प्रमाणात ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. तळवडे येतील ग्रामस्थ याच्या सहकाऱ्याने सावंतवाडी तळवडे वेंगुर्ला मार्ग मोकळा करण्याचें काम सुरू आहे.